उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : किशोर कराळे
मुंबई, ( दि. 26 ऑक्टोबर ) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते होम क्वारंटाईन होते. घरी विश्रांती घेत असतानाही त्यांनी कामाचा धडाका लावला होता.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
असा संदेश स्वतः अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.