युनिकेअर हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब येथे Maglumi 800 मशीनचे उदघाटन संपन्न
महाबुलेटीन न्यूज
चाकण : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चाकण युनिकेअर हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब येथे Maglumi 800 हे नवीन मशीन स्थापित केले. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सत्यजित सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि लॅप्रोस्कोपिक जनरल आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. आशिष काळे, सल्लागार रेडिओलॉजिस्ट आणि युनिकेअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. पल्लवी बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उदघाटन संपन्न झाले.
लॅब इन्चार्ज चंद्रकांत हिवरकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. उत्पादित कंपनीचे प्रमुख नीलेश पाटील यांनी मशिनची गुणवत्ता व सुविधेबाबत माहिती दिली. T3, T4, TSH, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, फेरीटिन, ट्रॉप I, प्रोकॅलसीटोनिन, NT PRO BNP, Sr. PSA, टॉर्च पॅनेल, ऑल हार्मोन्स, ऑल ट्यूमर मार्कर यासारख्या विशेष चाचण्या आणि इतर 180 चाचण्या थोडक्यात केल्या जातील. यावेळी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, प्रशासन कर्मचारी आदी उपस्थित होते.