‘तो’ खड्डा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वखर्चाने बुजविला
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : चाकण तळेगांव रस्त्यावरील युनिकेयर हॉस्पिटल समोर असणारा व अपघाताला आमंत्रण देणारा ‘तो’ खड्डा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवला आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून युनिकेअर हॉस्पिटल समोर मोठा खड्डा पडला असून वाहतुकीस अडथळा ठरत आहे, तर या खड्डयामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. गेली कित्येक महिने हा खड्डा बुजविण्यासाठी नाणेकरवाडी व परिसरातील नागरीकांनी संबंधित विभागाकडे वारंवार मागणी केली होती, त्यानंतर मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने हा खड्डा बुजविला होता. मात्र पावसामुळे व अवजड वाहतुकीमुळे तो पुन्हा उखडला असता कार्यकर्त्यांनी पुन्हा बुजविला आहे. राष्ट्रवादीचे तालुका उपाध्याक्ष कुशल जाधव, नितिन नाणेकर, नवनाथ नाणेकर, नवथान शेडगे, विशाल जाचक, गोरक्ष शेलार, बबलू नाणेकर, उपमंनु तासकर आदींनी विटांचे तुकडे टाकून खड्डा बुजविला आहे.