सुनील उबाळे यांची विधान परिषदेवर निवड करण्याची मागणी
बारा बलुतेदार परिवर्तन महाआघाडीचा पाठिंबा
महाबुलेटीन नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : मानव विकास संसाधन विकास संस्थेचे महासचिव सुनील उबाळे यांची विधान परिषदेवर निवड करण्याची मागणी बारा बलुतेदार परिवर्तन महाआघाडीने केली आहे. पुणे दापोडी येथे महाआघाडीच्या मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विधानपरिदषद सदस्यपदी बाराबलुतेदार परिवर्तन महाआघाडी 18 पगड जाती जमाती आणि इतर 70 पक्षाच्या अध्यक्षांनी आपला अधिकृत उमेदवार म्हणून सुनिलभाऊ उबाळे यांची विधानपरिदषदेवर निवड करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून जाहिर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीत बाराबलुतेदार परिवर्तन महाआघाडी ने संपुर्ण महाराष्ट्र राज्यामधे कॉंग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विधानसभेला निवडून आणल्याबाबत जाहिर पाठिंबा देऊन महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बाराबलुतेदार परिवर्तन महाआघाडीने योगदान दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर चर्चे मधे ठरल्याप्रमाणे विधान परिषदे सदस्य, महामंडळ व इतर शासकीय कमिटीची मागणी केल्या प्रमाणे मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून पत्र दिले. पत्रकार परिषदेमधे बाराबलुतेदार परिवर्तन महाआघाडीचे अध्यक्ष पी.के. गायकवाड, मानव संसाधन विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर, महासचिव सुनिलभाऊ उबाळे, बळीराजा पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन काका घारे, भारतीय मायनौरीटी सुरक्षा महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ खाडे, मानवता प्रतीष्ठान एक सामजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक तनपुरे, कार्याधक्ष संदीप ओव्हाळ, नॅशनल पँथरचे अध्यक्ष अरुण भिंगारदिवे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.