सोमेश्वर करंजेची श्रावण यात्रा रद्द
महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध अशा सोमेश्वर मंदीराची यात्रा दर वर्षी मोठ्या उत्साहात लाखो शिवभक्तांच्या उपस्थित दर वर्षी श्रावण महिन्यात होत असते, परंतु सध्याच्या करोनाच्या संकटामुळे या वर्षी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्त समितीने घेतला आहे.
विश्वस्त समिती अध्यक्ष विनोद भांडवलकर, विश्वस्त ॲड. गणेश आळंदीकर व सचीव सुनिल भांडवलकर यानी याबाबत माहीती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी यांंनी आपत्कालीन कायद्याच्या आधारे जिल्ह्यात लागु केलेल्या कायद्यानुसार करोना पासुन बचावासाठी सोशल डिस्टन्सींग रहावे, संचार बंदीचे काटेकोर पालन व्हावे, या हेतुने गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणुन देवस्थान समितीने तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विनोद भांडवलकर, विश्वस्त ॲड. गणेश आळंदीकर, सचीव सुनिल भांडवलकर, विश्वस्त सोमनाथ भांडवलकर, प्रताप भांडवलकर, प्रविण भांडवलकर, शशीकांत मोकाशी इ. विश्वस्त हजर होते.