Monday, January 26, 2026
Latest:
बारामतीविशेषसण-उत्सव

प्रथमच श्रावण महिन्यात सुप्रसिद्ध सोमेश्वर करंजे येथील  मंदिर परिसरात शुकशुकाट…

महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारे सोमेश्वर करंजे येथील प्रति सोरटी सोमनाथाचे मानले जाणारे प्राचीन सोमेश्वर मंदिर  करंजे येथे आहे. दर वर्षी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी  येथे  मिठाईवाले, खेळणीवाले, पाळणे, फोटो व्यवसायिक, हळदी-कुंकू, भांडार व गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल अशा वेगवेगळ्या आकर्षक दुकानांनी  मंदिर परिसर हा गजबजत असतो.
या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये व एक उपाययोजना म्हणून  शासनाने सर्वत्रच मंदिरे बंदचा निर्णय घेतला आहे. मोठ्या संख्येत भरणाऱ्या श्रावण यात्रा रद्द झालेली असल्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात शुकशुकाट पसरलेला आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येत शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे बंद आहेत. तर पुणे जिल्ह्याधिकारी यांनी दिलेल्या देऊळ बंदच्या आदेशाने बारामती तालुक्यातील श्री सोरटी सोमनाथाचे करंजेचे ही मंदिर बंद आहे.
दर्शनासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील भाविकांनी येऊ नये, असेही आवाहन व विनंती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी केले होते. श्रावण महिन्यातील पहिला  सोमवार असून परिसरातील भाविक गर्दी व दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्यामुळे वडगाव पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या आदेशानुसार पोलीस व पोलीस कर्मचारी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त बजावत आहेत. तसेच कोणीही आपले घर सोडून दर्शनासाठी येऊ नये असेही आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!