Saturday, August 30, 2025
Latest:
अध्यात्मिकआंदोलनधार्मिकपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रमावळविशेष

श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगराला पाडल्या जाणाऱ्या बोगद्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट व काळेवाडी ग्रामस्थांचा विरोध…

श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगराला पाडल्या जाणाऱ्या बोगद्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट व काळेवाडी ग्रामस्थांचा विरोध…

महाबुलेटीन न्यूज : सोमनाथ नढे
पिंपरी : पुणे शहरातून जाणारा रिंग रोड हा श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथून जाणार आहे व त्यासाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडण्यात येणार आहे, यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट नढेनगर, काळेवाडी व ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. त्यात श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगरावर साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वास्तव्य होते. अशा या पवित्र व वारकरी संप्रदायाला अत्यंत प्रिय असलेल्या भंडारा डोंगराला बोगदा पाडण्याचे काम म्हणजे संतांचे वास्तव्य नाकारणे असे आहे. त्याचप्रमाणे समस्त हिंदू धर्म व वारकऱ्यांच्या भावना जाणून बुजून दुखवण्यासारखे आहे. ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जगाला उपदेश केले त्यांचेच नामोनिशान पुसू नये.

समस्त वारकरी संप्रदायाचा व जनतेचा या कामास प्रचंड विरोध आहे. डोंगराच्या एका दगडालाही आम्ही हात लावू देणार नाही. तरी सदरचे काम रद्द करण्यात यावे. अन्यथा या विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे शासनच जबाबदार असेल, असा इशारा नगरसेवक विनोद नढे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. सदरील बोगद्याचे काम रद्द करून रिंग रोडसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट नढेनगर, समस्त काळेवाडी ग्रामस्थ यांनी केली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!