‘शोले’ मधील सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड

मुंबई : शोले चित्रपटातील सुरमा भोपाली ची भूमिका अजरामर केलेला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता सैयद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचे ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. त्यांचे खरे नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे असून ते जगदीप या नावाने बॉलिवूडमध्ये परिचित होते. जगदीप यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयास सुरुवात केली. अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के हे त्यांचे बाल कलाकार म्हणून भूमिका केलेले चित्रपट होते.
बिमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटाद्वारे त्यांनी विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.