Sunday, August 31, 2025
Latest:
जुन्नरनागरी समस्यापुणे जिल्हाविशेष

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर कोऱ्हाळे यांनी नारायणगाव ग्रामपंचायतची केली पोल खोल

 

नारायणगाव ग्रामपंचायतीचा खुनशी कारभार : चंद्रशेखर कोऱ्हाळे यांचा घणाघाती आरोप

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव, दि. ३० ऑक्टोबर ( किरण वाजगे ) : नारायणगाव ग्रामपंचायतीने ‘तोडा आणि फोडा’ या वृत्तीचा अवलंब करून गावामध्ये खुनशी कारभार चालवला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांनी केला आहे.नारायणगाव येथे ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कारभाराविषयी माहिती सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर कोऱ्हाळे बोलत होते.

यावेळी माजी सरपंच अभिमन्यू सुर्वे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जंगम, सुभाष मेहेत्रे, गणेश तांबे, हितेश को-हाळे, अनिल शिंदे, चंद्रशेखर पतसंस्थेचे अध्यक्ष धनंजय को-हाळे, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठया असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीचा आणि विद्यमान सरपंच व सद्स्यांचा भ्रष्ट कारभार सुरू असून, सरपंच व सदस्य यांचे फक्त तोडा आणि फोडा हे धोरण आहे. माजी सरपंच यांच्या काळात झालेली विकासकामे विद्यमान सरपंच तोडून नासधूस करत आहे. स्मशानभूमी परिसरात असलेल्या अनेक देवदेवतांच्या मूर्ती यांनी कोठे नेल्या ? असा सवाल करत ‘विठु माझा लेकुरवाळा‘ हे भव्य शिल्प काढून टाकण्याचा यांचा डाव आहे. असे सांगून नारायणगाव ग्रामपंचायतीच्या अनेक गोष्टींचा पोलखोल शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व मुक्ताबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर को-हाळे यांनी केला आहे.

यावेळी श्री को-हाळे पुढे म्हणाले की, स्मशानभूमी पाडली, कोव्हिड काळात नारायणगावचा व्यापार संपला. खोडद रस्त्यावर खूपच खड्डे पडले, ब्रम्हकुमारी ते शिवविहार रस्ता खांडून ठेवला, नागरिकांची अडचण केली. यांचा ‘हम करेसो कायदा’ आहे. महिलांना त्रास होतोय कुणी काही बोललं की, चार पोरं उभी करायची असा यांचा कायदा आहे. कच-याच्या गाड्या नवीन आहेत, मात्र काही दिवसांपूर्वी घेतलेल्या जुन्या गाड्या आहेत की नवीन हेच कळत नाही. पीकअप नव्या आहेत, मात्र इतर गाड्यांबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नारायणगाव पोलीस स्टेशनचे पूर्वीचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे यांच्या काळात ग्रामपंचायतीच्या मदतीने व्यापाऱ्यांना त्रास दिला गेला. मात्र नवीन सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या काळात एकाही व्यापाऱ्यावर केस झाली नाही. व्यापारी नारायणगाव सोडून जायला लागले. त्यामुळे नारायणगावची अर्थव्यवस्था बदलली. तुमच्या डोक्यात नारायणगावचे काय व्हिजन आहे?…असा प्रतिप्रश्नही यावेळी को-हाळे यांनी केला.

डोळे हॉस्पिटल च्या आवारात असलेली गायरान जागा ताब्यात घेतली. जिल्हाधिकारी साहेबांकडे याबद्दल तक्रार केली आहे. तहसीलदारांनी परवानगी दिलेल्या कॉव्हिड हॉस्पिटलला ग्रामपंचायतने परवाना दिला नाही. आरोग्य मंत्र्यांच्या फोनला ही सरपंचांनी प्रतिसाद दिला नाही. गॅस पाईप लाईनही चुकीची आहे. स्वतःचा पंप उभारायचा इरादा आहे. लोकांनी यांना भावनेच्या भरात निवडून दिले. ‘डुक्कर मुक्त नारायणगाव, प्लास्टिक मुक्त नारायणगाव करू’, बोलले मग आता वेळ आली आहे, एखादं ठोस काम सांगा यांनी काय केलं ? असा सवाल सुद्धा को-हाळे यांनी केला.

तुम्ही केलेलं एखादं तरी ठोस काम सांगा? आमच्या काळात आम्ही प्रत्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. डागडुजी केली. नारायणगावची जनता या कारभारी लोकांना कंटाळली आहे, असं सांगत आम्ही याबद्दल ग्रामविकास मंत्री ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे यांच्या मनमानीची तक्रार केली आहे.

कोरोना योद्धा कुठे गेले? कोराना काळात रस्ते अडवले, जुन्नर रोड किती तरी दिवस बंद होता. अशीच परिस्थिती राहिली तर आमच्या कुवती नुसार आम्ही लोकांना साथ देऊ, सरळ मार्गाने कायदेशीर मार्गाने लढा देणार, अशी आमची भूमिका आहे. असं त्यांनी सांगितलं.

कोरोना काळात नारायणगाव मधील १३ ते १४ मुली पळून गेल्या. तक्रार केली तर पोलीस आई वडिलांना त्रास द्यायचे. पळवून नेणाऱ्या मुलांच्या मागे कोण उभं राहिलं?..पोरं कोण होती याचाही शोध घेतला पाहिजे. यांचे असे हे उद्योग आहेत यांची उत्पन्नाची साधने सांगा. याला नड, त्याला नड हा धंदा चालू आहे.

कुबेर मधूकोश सोसायटीतल्या १०५ नंबरच्या फ्लॅटची ८अ ला सुलभा चंद्रशेखर को-हाळे नावाची नोंद असताना सुरेखा कहाणे यांची नोंद विध्यमान ग्रामपंचतीच्या कारभा-यांनी कशी केली? लाईटबिल, मेंटेनन्स आम्ही भरतो. याबाबत पोलिसात तक्रारही केली आहे. कोवीड काळामध्ये सरपंच व त्यांचे कार्यकर्ते दोन-तीन लॉज घेवून काय करत होते ? असा जहरी सवाल देखील कोऱ्हाळे यांनी यावेळी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!