सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने सावित्रीच्या लेकी आशा वर्कर्सचा कोव्हिड योध्दा पुरस्काराने गौरव,
आशा वर्कर्स, डॉक्टरर्स, नर्स, कर्मचारी यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज
जुन्नर : महात्मा फुले ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आशा वर्कर्स, डॉक्टरर्स, नर्स, कर्मचारी यांचा सन्मान
महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने सावित्रीच्या लेकी आशा वर्कर्सचा कोव्हिडं योध्दा पुरस्कार व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन सत्कार करण्यात आला. आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच डॉक्टर व नर्स कर्मचारी यांना बालाजी उद्योग समूह, बी के टी टायर वतीने सुरक्षा किट (पीपी किट) चेही वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गावा गावात आशा वर्कर्स यांनी अखंडपणे मदत कार्य सुरू ठेवलेले आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर, जुन्नर, सावरगाव, नारायणगाव, बेल्हे, मढ आळे, सर्वच विभागातील आशा वर्कर्सचा गावागावात जाऊन टप्प्याटप्प्याने ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी दिली.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सदस्य जीवनभाऊ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आनंद रासकर, ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर किरण जाधव, डॉ आकाश त्रिभुवन, डॉ. प्रकाश गावित, जेष्ठ महिला विजया गाडेकर, डॉ. आरती जाधव, प्राध्यापिका अरुणा वाघोले, आरोग्य सेविका सुनिता गाडेकर, पत्रकार सुभाष डोके, तालुका अध्यक्ष, वसंत कापरे, तालुका उपाध्यक्ष किरण वाघोले, जुन्नर तालुका सहसचिव आत्माराम बनकर, आळेफाटा शहर अध्यक्ष मनिष गडगे, जुन्नर शहराध्यक्ष संजय डोके, जुन्नर शहर कार्याध्यक्ष सुमंत मेहेर, जुन्नर शहर प्रसिद्धी प्रमुख प्रविण ताजणे, बेल्हे शहर अध्यक्ष शंकर शिंदे, ऋषिकेश वाघोले, गणेश दाईत, सागर भास्कर इतर मान्यवर उपस्थित होते.