Sunday, April 20, 2025
Latest:
खेडग्रंथालयमहाराष्ट्र

संतभारती ग्रंथालयात सफाई कामगार, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचा सन्मान

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सफाई कामगार, रिक्षा चालक अशा विविध क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ, ग्रंथ, भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नाणेकरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पूनम नाणेकर, सफाई कामगार सरस्वती कांबळे, रत्ना सावंत, आशा वर्कर वर्षा नाणेकर, अर्चना नाणेकर, संगीता नाणेकर, अंगणवाडी सेविका वंदना जाधव, अलका नाणेकर, मनिषा फलके, कल्याणी नाणेकर, रिक्षा चालक नीता परसरामपुरिया, ग्रंथपाल सुवर्णा कोलते, उर्मिला जाधव आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!