महाबुलेटीन न्यूज : “एक पाऊल, माता भगिनींसाठी” या उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशन आणि गाथा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : मकर संक्राती निमित्त कान्हेवाडी तर्फे चाकण ( ता. खेड ), येथे पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशन आणि गाथा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व विशेष प्रयत्नांतुन “एक पाऊल, माता भगिनींसाठी” या उपक्रमांतर्गत सौभाग्याचं लेणं असलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वान देण्यात आले. मोठ्या संख्येने कान्हेवाडीतील माता भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.