साकुर्डी येथे आदिवासी दिन साजरा
महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
वाडा : कोरोना मुळे सर्व नियमांचे पालन करुन साकुर्डी ( ता.खेड ) येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्याक्रमाप्रसंगी सरपंच ज्योती सुपे म्हणाल्या, आदिवासी समाजाने आपली संस्कृती,निसर्गातील आपली दैवते जपली पाहिजेत.संघटनात्मक एकी ठेवायला हवी.
गावच्या सरपंच ज्योती सुपे, उपसरपंच कुंडलिक वर्ये व उपस्थितांनी प्रथम आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले. ग्रामपंचायत सदस्य किरण भवारी, किरण तळपे, बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष रोहित सुपे, दिलिप लाडके, उमेश लोहकरे, संतोष लोहकरे, जिजाभाऊ लांघी यांनी तळपेवाडी, निर्मळवाडी, तळपेवाडी येथे आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पुजन केले. अशोक वर्पे, काशिनाथ लाडके, अविनाश भोकटे, ग्रामपंचायत सदस्य सविता वर्पे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
—————