साकुर्डी गावच्या उपसरपंचपदी किरण तळपे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा : साकुर्डी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण तळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार दिलिप मोहिते, माजी दुग्ध व पशु संवर्धन सभापती अरुण चांभारे यांचे ते खंदे समर्थक आहेत. यावेळी सरपंच ज्योती सुपे, खेड तालुका बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष रोहित सुपे, विनायक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य किरण भवारी, ग्रामपंचायत सदस्य वैभव लोहकरे, माजी उपसरपंच सुरेखा चौधरी, नंदा कोकणे, अर्चना सुपे, बबन चौधरी, सुभाष कदम, काशिनाथ लाडके, चिमाजी लोहकरे, दिलिप लाडके, पोलिस पाटील मारुती चौधरी, चंद्रकांत सुपे आदी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी खेड तालुका बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष रोहित सुपे म्हणाले की, गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्वच मान्यवर महत्वाचे आहेत. गावातील जेष्ठ मंडळीचे सहकार्य घेऊन व सर्वच ग्रामस्थांना सहभागी करुन घेतल्यास गावाचा विकास जलद गतीने व चांगल्या पद्धतीने करता येईल.गावचा विकास हाच ध्यास हा उपक्रम सरपंच, उपसरपंच यांनी राबवायला हवा.
…………….