रुग्णवाहिकांना रात्री सायरनला बंदी, अन्यथा रुग्णवाहिका चालकांवर फौजदारी कारवाई…
रुग्णवाहिकांना रात्री सायरनला बंदी, अन्यथा रुग्णवाहिका चालकांवर फौजदारी कारवाई…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : रुग्णवाहिकांना रात्रीच्या वेळी सायरन सुरू ठेवण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ( आरटीओ ) आज ( 10 मे ) पासून बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णवाहिकांच्या चालकांवर फौजदारी कारवाई होणार आहे.
रुग्णांची वाहतूक करताना रुग्णवाहिका चालक दिवसाही विनाकारण हॉर्न वाजवत सायरन सुरू ठेवतात. तसेच रात्रीही आवश्यकता नसताना सायरन सुरू ठेवला जातो. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होते. तसेच घरच्या घरी उपचार घेणाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. नागरिकांची झोपमोडही होते. एकाचवेळी हॉर्न आणि सायरन सुरू ठेवल्यास ध्वनी प्रदूषण होते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन विनाकारण सायरन वाजविण्यास बंदी घातली आहे. तसेच रात्री सायरन व सुरू ठेवायचा नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बजावले आहे.