रोटरी क्लब ऑफ चाकण यांच्या तर्फे चाकण नगर परिषदेला ऑक्सिमिटर, थर्मामिटर व सॅनिटायझर भेट
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : कोरोना चाचणी करण्यासाठी ऑक्सीमेटर, थर्मामीटर व सैनिटाइजर बोटल्स इत्यादी वस्तुंची मागणी नगरपरिषदेने रोटरी क्लब ऑफ चाकण यांच्याकडे मागणी केल्यानुसार रोटरी क्लब ऑफ चाकण यांनी आज ( दि. १४ सप्टेंबर ) ला या वस्तू नगरपरिषदेला प्रदान केल्या.
चाकण नगरपरिषद येथे मुख्याधिकारी श्री. नानासाहेब कामठे, विरोधीपक्ष नेते श्री. जीवनशेठ सोनावणे, नगरसेवक ऍड. श्री. प्रकाश गोरे, पत्रकार श्री. संजय बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चाकणचे सचिव रो. श्री. सुभाष शिंदे, खजिनदार श्री. संतोष कापूरे, रो. श्री. भगवान घोडेकर, रो. श्री. सुहास गोरे, रो. श्री चांगदेव सोरटे, रो. श्री. चंद्रकांत गोरे आदी उपस्थित होते.