रोख देणगी ऐवजी दानपेटीत मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्हज दान करण्याचे आवाहन
रोख देणगी ऐवजी दानपेटीत मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्हज दान करण्याचे आवाहन
गणेश स्थापनेनंतर दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन जमा
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर ( दि. २१ ऑगस्ट ) : श्रीगणरायाची स्थापना व गणेश आरती झाल्यानंतर मंदिराच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात येथील राधिका गणेश मंदिराच्या दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन जमा झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणा-या भक्तांनी दानपेटीत पैश्यांऐवजी मास्क, सॅनिटायझर, अथवा ग्लोव्हजचे दान करावे, असे आवाहन राधिका गणेश मंदिराच्या वतीने नगरसेवक अनिकेत वाघ यांनी केले होते.
आज सायंकाळी सात वाजता राधिका गणेश मंदिराच्या श्री गणेशाची स्थापना झाली. किरण कणसे, निखील बंगाळे, उमेश मखरे, सुरज बंगाळे यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर तासाभरात गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन दान टाकले.
——
( जाहिरात : प्रतिनिधी शैलेश काटे )