राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी पै. सौरभ काकडे यांची निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी पै. सौरभ काकडे यांची निवड
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : वडगाव येथील युवक नेते सौरभ काकडे यांची नुकतीच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पै. सचिन घोटकुले यांनी सौरभ काकडे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील निष्ठा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, पालकमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील केलेल्या समाजकारणातील कामामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. यापुढे संपूर्ण पुणे जिल्ह्यात पक्षसंघटना वाढविणेसाठी प्रयत्न करणार असलेचे सौरभ काकडे यांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले.