राज्यपालांकडून कोरोना वॉरियर्सचा सत्कार
राज्यपालांकडून कोरोना वॉरियर्सचा सत्कार
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांनी कोव्हिड महामारीच्या काळात मंथन फाउंडेशन आणि कुमाऊँ मित्र मंडळ, पुणे ह्यांनी केलेल्या मदत कार्याचा गौरव करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या सदस्यांना निमंत्रित करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मान केला. सन्मानित करण्यासाठी ह्या योद्ध्यांना मा. राज्यपालांनी राज भवनावर भेटीला बोलावले होते.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून ह्या दोन्ही संस्थांनी अनेक प्रकारचे कार्य केले, ज्यामध्ये गरजूंना अन्न- धान्य पुरवठा, कामगारांसाठी सुविधा देणे व प्रवासी श्रमिकांच्या प्रवासाची व्यवस्था अशा बाबींचा समावेश होता.
मा. राज्यपाल महोदयांनी सन्मानित केलेल्या कोरोना योद्ध्यांमध्ये मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या आशा भट्ट, अध्यक्षा, कुमाऊँ मित्र मंडळाचे अध्यक्ष पी. सी. जोशी, अशोक भट्ट, योगेश कापड़ी, देवेंद्र सिंह ढेक, गढ़वाल भ्रातृ मंडळाचे ऋषी बिष्ट, रोहीत बिष्ट, डॉ. गिरिजाशंकर मुंगली, जीवन खाती, जीवन सिंह गोस्वामी आणि कमल घिल्डियाल ह्यांचा समावेश होता.
—–