प्रशासकीयमहाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे
मुंबई :
दिनांक १३ मार्च २०२४

मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर
( मराठी भाषा विभाग)

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार
( गृह विभाग)

अहमदनगर शहराचे नामकरण *अहिल्यानगर* करण्यास मान्यता
( सामान्य प्रशासन विभाग )

केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार, राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता
( नगरविकास विभाग)

श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार, अडीच एकर भूखंड घेणार
( सार्वजनिक बांधकाम विभाग)

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य, ३२०० कोटींचा प्रकल्प
( मदत व पुनर्वसन)

भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज
( वित्त विभाग)

राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार, हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
( आरोग्य विभाग)

महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, नफ्यात आणणार
( दुग्धविकास विभाग)

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता, ३५ गावांना लाभ होणार
( जलसंपदा विभाग)

मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार, १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार
( जलसंधारण विभाग)

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ, आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना.
( महिला व बालविकास)

मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
(वैद्यकीय शिक्षण)

आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
( कौशल्य विकास)

कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
( ऊर्जा विभाग)

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार, ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
( ऊर्जा विभाग)

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना, प्रशासनात सुधारणा होणार
(पशुसंवर्धन व दुग्धविकास)

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यास मान्यता
( महसूल विभाग)

म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार, युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन
( वैद्यकीय शिक्षण विभाग)

आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
( सार्वजनिक आरोग्य विभाग)

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
( परिवहन विभाग)

मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार,
उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
( नगरविकास विभाग)

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार, या वर्षात दहा हजार किमी रस्ते
( ग्रामविकास विभाग)

भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार,
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन
( महसूल व वन विभाग)

जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
( परिवहन विभाग)

दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना
( पशुसंवर्धन व दुग्धविकास)
=============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!