राजभवनात पोहचला कोरोना… मुंबईतील राजभवन येथे चोवीस जणांना कोरोना
महाबुलेटिन नेटवर्क|विशेष प्रतिनिधी
मुंबई: राजभवन येथे कोरोना बाधित चोवीस रुग्ण आढळून आले आहेत. राजभवनात कोरोना पोहचल्याने खळबळ उडाली आहे. राजभवनावरील कोरोनाची संख्या मोठी असल्याने ही चिंतेची बाब आहे.
राजभवनात १०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत चौदा जणांचे अहवाल सुरुवातीस पॉझिटीव्ह आले होते. आता हा कोरोनाग्रस्तांचा आकडा चोवीसवर पोहचला आहे.राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी संबंधितांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत