राजर्षी श्री शाहु महाराज जयंती तसेच राजर्षी श्री शाहु प्रतिष्ठान संस्थेचा व ग्लॅडिओलस इंग्लिश मेडीयम स्कूल, चाकण प्रशालेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा..💐💐💐
राजर्षी श्री शाहु महाराज जयंती तसेच राजर्षी श्री शाहु प्रतिष्ठान संस्थेचा व ग्लॅडिओलस इंग्लिश मेडीयम स्कूल, चाकण प्रशालेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : राजर्षी श्री शाहु प्रतिष्ठान संचालित ग्लॅडिओलस इंग्लिश मेडीयम स्कूल, चाकण प्रशालेचा वर्धापनदिन कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत व उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अनिल देवडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानिमीत्त खेड तालुक्याचे माजी आमदार संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक अॅड. राम कांडगे यांनी शाहु महाराज यांचा जीवनपट उलगडून त्यांचे शिक्षण, शेती व इतर कार्यावर प्रकाश टाकला.
कोणत्याही शैक्षणिक संकुलाचे महत्वाचे चार स्तंभ असतात ते म्हणजे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक; परंतु या जागतिक महामारीमुळे सध्या सर्व गोष्टी पूर्णपणे बंद आहेत. तरीदेखील पालक व विद्यार्थापर्यंत तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रभावीपणे चालू आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजेश राम कांडगे, उपाध्यक्ष विष्णू किसन कड, सचिव अॅड. निलेश नानाभाऊ जाधव, खजिनदार संतोष रत्नाकर वाघ, रोटरी क्लब एअरपोर्टचे संस्थापक अध्यक्ष तुकारामशेठ कांडगे, नानाभाऊ जाधव, संचालक संदीप परदेशी, ऋषिकेश बुचुडे व महिला संचालिका सौ. रेणू कांडगे, सौ. सीमा कड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य संतोष जोसेफ यांनी आभार मानले.
००००