पुणे विभागात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ३.३९टक्के
कोरोनाग्रस्तांची संख्या चाळीस हजारांवर-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभागात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ३.३९ टक्के इतके असून रुग्णसंख्या चाळीस हजारांवर पोहचली असल्याची माहिती विभाषीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात कोरोनाचे रुग्ण चोवीस हजार चारशे बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येने चाळीस हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ॲक्टीव रुग्ण १४ हजार ४७९आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण १ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६९३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.६३ टक्के आहे.
पुणे जिल्हयात ३३हजार ६०७ बाधीत रुग्ण असून वीस हजार ४८५ रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या बारा हजारांंवर आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ९ हजार ३५६,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २ हजार ११५ व कॅन्टोंन्मेंट १०२, खडकी विभागातील ६०, ग्रामीण क्षेत्रातील ४७०, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील ६५ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण ९५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५३० रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण ६०.९५ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.८४ टक्के इतके आहे.