Friday, April 18, 2025
Latest:
अपघातइंदापूरपुणे जिल्हामहाराष्ट्रलातूरविशेष

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात मुलगा व पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार…

लातूर येथील टायरचे व्यापारी अरूण माने यांच्यासह अपघातात पत्नी व मुलाचा जागीच मृत्यू

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
इंदापूर : ट्रॅक्टर व कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडीलासह मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. लातूर येथील व्यापारी अरूण माने हे कुटुंबातील सदस्यासह पुण्यावरून लातूरला येत असताना. त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघात एकाच कुटुंबातील तिघाचा जागीच मृत्यू झाला. कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ७ रोजी रात्री १० वाजता पुण्यावरून स्व;ताची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.२४ ए.टी.२००४ या फॉरच्यूनर गाडीमध्ये अरूण बाबुराव माने,(वय ४६) , पत्नी गीता अरूण माने (४०) व मुलगा मुकूंदराज अरून माने (१२) हे तिघे पुण्यावरून येत असताना रात्री १० वाजता अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने गाडीचा अपघात झाला. यात तिघे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अरून माने यांचे टायरचे उद्योग आहेत. निलंगा शहरात बिदर रोडवर त्यांचे माने टायर नावाने मोठे शोरूम आहे. या अपघाती निधनामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून या कुटुंबातील एक मुलगी सोबत नसल्यामुळे बचावली आहे. 

याबाबत इंदापूर पोलिस ठाण्यात अपघाती निधन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!