पुणे-नासिक महामार्गावर स्पायसर चौकात एका वर्कशॉपमध्ये टेम्पो घुसला
सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र कोरोनाच्या भीतीमुळे गाडीत अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्यास विलंब
महाबुलेटीन नेटवर्क / उमेश सातव
चाकण : पुणे-नासिक महामार्गावर आळंदी फाट्याजवळील एमआयडीसीच्या स्पायसर चौकात भरधाव वेगाने जाणारा ७०९ टेम्पो एका वर्कशॉप मध्ये घुसल्याची घटना आज ( दि. १९ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून गाडीमध्ये एकजण अडकलेला होता, मात्र कोरोनाच्या भीतीमुळे बघ्यांनी गाडीत अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्यास असमर्थता दाखवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्यातच टेम्पोखाली दोन दुचाकी अडकल्या होत्या, काही वेळाने घटनास्थळी वाहतूक पोलीस पोहोचले. त्यांनी अपघात ग्रस्ताला बाहेर काढले. हा टेम्पो लोखंडी सामान घेऊन जात होता.