Sunday, August 31, 2025
Latest:
पिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रशासकीयविशेष

पुणे जिल्ह्यतील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

घटस्थापना, धनत्रयोदशी व आळंदी यात्रा या तीन सुट्ट्यांच्या समावेश

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
पुणे, दि. २१ : शासन, राजनैतिक सेवा विभाग, निर्णय क्र.पी- १३-२ बी, १६ जानेवारी १९५८ व शासन, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र. सावैसु-स्था-१०८३.१७७१- (६४)- ८४ -२९, १४ मार्च १९८३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सन-२०२१ या वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संतोष पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

यामध्ये गुरुवार, ७ ऑक्टोबर – घटस्थापना, मंगळवार, २ नोव्हेंबर – धनत्रयोदशी, मंगळवार, ३० नोव्हेंबर – आंळदी यात्रा या तीन दिवशी स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!