Saturday, April 19, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाप्रशासकीयविशेषस्पर्धा

पुणे जिल्हयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 1 ऑक्टोबर : कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने पुणे जिल्हयात विविध स्पर्धा घेण्यासाठी नोडल (समन्वय) अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत. याशिवाय इतरही अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून या समन्वय अधिका-यांनी याबाबत जिल्हयातील सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे.

■ जिल्ह्यात नियुक्त केलेल्या अधिका-यांनी करावयाची कामे पुढीलप्रमाणे:-
—————-

महादेव घुले (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे) : वक्तृत्व/गाणे/नाटिका/ एकपात्री व्हिडीओ स्पर्धा- “कुटुंबाची साथ कोरोनावर मात” या घोषवाक्यास अनुसरुन शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटामध्ये स्पर्धा घेणे. 2 मिनिटांचा व्हिडिओ व्हॉटसॲप व फेसबुक पेज द्वारे घेणे, परीक्षक नेमणे, तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर निवड करुन प्रमाणपत्र देणे.

गणपत मोरे (शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, पुणे) : पोस्टर/रांगोळी स्पर्धा, दिपोत्सव, चित्रकला, हस्तकला, कोलाज, फोटोग्राफी, रांगोळी स्पर्धांचे फोटो, व्हॉटसॲप व फेसबुक पेज द्वारे घेणे, परीक्षक नेमणे, तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर निवड करुन प्रमाणपत्र देणे. दिपोत्सवासाठी ठिकाण व वेळ निश्चित करणे.

● सुनील कु-हाडे (शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे) : निबंध स्पर्धा ‘कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी’ या विषयावर 500 शब्दमर्यादेची निबंध स्पर्धा आयोजित करणे.

● राजेंद्र सरग (जिल्हा माहिती अधिकारी, पुणे) : छायाचित्र स्पर्धा, फेसबुक लाईव्ह, युट्यूब चॅनल तयार करणे, सोशल मिडीयाद्वारे जाहिरात करणे – कोरोना विषयासंदर्भातील छायाचित्र स्पर्धा आयोजन करणे, परीक्षण करणे, फेसबुक लाईव्ह द्वारे प्रेक्षकांना प्रश्न विचारणे, प्रश्नसंच तयार करणे, उत्कृष्ट आणि पारितोषिक प्राप्त व्हिडीओ/फोटो यांना युटयुबवर प्रसिध्दी देणे, सर्व स्पर्धांबाबत प्रचार – प्रसिध्दी करणे व्हिडीओ क्लिप/पोस्टर करणे.

● डॉ. अभय तिडके (सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे) : शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेणे, तालुका स्तरावर गट विकास अधिकारी /तहसीलदार/केंद्रप्रमुख यांनी उत्कृष्ट टीम निवडून जिल्हास्तरावर स्पर्धा घेणे. कोरोना विषाणू निगडीत प्रश्नसंच तयार करणे. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) द्वारे स्पर्धचे आयोजन करणे, कोविड प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात चित्ररथ तयार करणे.

● दत्तात्रय मुंढे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे) : जिल्ह्यामध्ये गुढी महोत्सवाचे आयोजन करणे, घोषवाक्यांच्या किंवा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात कल्पकतेने गुढी उभारणे व त्याचे फोटो व्हॉट्सॲप/फेसबुक पेजद्वारे घेणे. उत्कृष्ठ गुढीला प्रमाणपत्र देणे. गुढी महोत्सवाचे ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रण करणे.

● नितीन मैद (उप प्रादेशिक अधिकारी, पुणे) आणि संजीव भोर (विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ, पुणे) :
एसटी बसेसवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भातील प्रचाराचे पोस्टर लावणे, अन्य वाहनांवर स्टीकर लावणे.

● भानुदास गायकवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे) : शिवभोजन केंद्रावर स्पर्धाबाबत पोस्टर्स लावणे, केंद्रावरील सेवकांना लोगो असलेले टी शर्ट वाटप करणे, रेशनकार्डवर स्टीकर लावणे.

● मुख्याधिकारी, सर्व नगरपालिका, पुणे जिल्हा : नगरपालिका क्षेत्रामध्ये योग्य ठिकाणी होर्डिंग लावणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!