पुणे जिल्ह्यात गायरान जागेवर केलेली अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नेमल्या तालुका वाईज समित्या, माहिती सेवासमितीच्या तक्रारीची घेतली दखल
पुणे जिल्ह्यात गायरान जागेवर केलेली अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नेमल्या तालुका वाईज समित्या, माहिती सेवासमितीच्या तक्रारीची घेतली दखल
महाबुलेटीन न्यूज
पुणे : जिल्ह्यात गायरान जागेवर केलेली अतिक्रमणे काढण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी तालुका वाईज समित्या नेमल्या आहेत. माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सरकारी गायरान जागेवर खुप मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. मोठ्या गावांमध्ये तर अनेक पुढाऱ्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. व्यावसाईक दुकाने थाटूनलाखो रुपये महिना कमवत आहेत, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरे बांधली आहेत, काही ठिकाणी शेती केली जात आहेत. महसूलविभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे सर्व अतिक्रमणा बाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीवारघडे यांनी केली आहे.
त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात चौकशी समिती नेमून अहवाल मागवला आहे. सदरची कारवाई होईपर्यंतआम्ही पाठपुरावा करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले आहे.
0000