पुणे जिल्हा व खेड तालुका किसान काँग्रेस संघटनेचा खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांना पाठिंबा… ● मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांना पाठविले निवेदन…
पुणे जिल्हा व खेड तालुका किसान काँग्रेस संघटनेचा खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांना पाठिंबा…
● मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांना पाठविले निवेदन…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्हा किसान काँग्रेस व
खेड तालुका किसान काँग्रेस संघटनेस सेझ बाधित शेतकऱ्यांचे दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले निवेदन मिळाले. त्यानुसार संघटनेच्या वतीने सेझ बाधीत शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला.
संघटनेच्या वतीने सेझ बाधित शेतकऱ्यांचा 15 टक्के परतावा हा प्रश्न त्वरित सोडविण्यास संदर्भात कार्यवाही व्हावी. यासंदर्भातील निवेदन १२ मे २०२१ रोजी माननीय मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांना देण्यात आले आहे. निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १२ वर्ष प्रलंबित असून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून व निवेदन देऊनही त्यांना न्याय मिळाला नाही. ४५० भागधारकाचे अंदाजे पंचावन्न कोटी रूपये एवढी आगाऊ रक्कम जमीन संपादनाच्या वेळेस कपात करण्यात आली असून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळाला नाही.
याबाबत सेझबाधित शेतकऱ्यांची आशी भूमिका आहे की, शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे त्यामुळे हा प्रश्न शासकीय पातळीवर सोडविला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एमआयडीसीमुख्य कार्यकारी अधिकारी, केईआयपीएल प्रतिनिधी, सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
सेझ बाधित शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला पुणे जिल्हा किसान काँग्रेस व खेड तालुका किसान काँग्रेस संघटना यांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी यापुढे संघटना तीव्र आंदोलन सेझ बाधित शेतकऱ्यांना समवेत घेऊन करणार आहे. हा प्रश्न पूर्ण सुटेपर्यंत संघटना सेझबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार असून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार आहे. असे पुणे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष श्री. चंद्रकांत गोरे व खेड तालुका किसान काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष इतर पदाधिकारी श्री. सुभाष होले, विजय डोळस, जमीरभाई काझी, लक्ष्मण वाघ, अनिल देशमुख व इतर पदाधिकारी यांनी जाहीर केले.
किसान काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पाटोले यांच्या पर्यंत हा प्रश्न पोचवला असून लवकरात लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्याचे नियोजन आहे, असे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गोरे यांनी सांगितले.
किसान काँग्रेस संघटनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे. काशिनाथ हजारे, पंढरीनाथ दौंडकर, सुरेश गोरडे, विश्वास कदम, ॲड. सुनील लिमगुडे, दादाभाऊ जैद, भानुदास नेटके यांनी विशेष प्रयत्न केले.
०००००