पुणे जिल्ह्यात 68 हजार 686 रुग्ण बरे होऊन गेले घरी
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पुणे : जिल्हयात 68 हजार 686 कोरोना बाधीत रुग्ण असून 41 हजार 399 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 25 हजार 617 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 736, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 528, पुणे कॅन्टोंन्मेंट 175, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 33 व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 95 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 181, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 291 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 90, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 44 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 662 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.