पत्रकार विरोधी होणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ● राज्य मराठी पत्रकार परिषदेची कोरोना पार्श्वभूमीवर पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन बैठक संपन्न
पत्रकार विरोधी होणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख
● राज्य मराठी पत्रकार परिषदेची कोरोना पार्श्वभूमीवर पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन बैठक संपन्न
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : पत्रकार हे खरे समाजाचे चौथे बिंदू असून एक महत्वपूर्ण प्रसार माध्यमांचे साधन पत्रकारच आहेत. सद्यस्थितीत कोरोनाच्या पाश्वभूमीवर पत्रकार आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी बातम्या देण्याचे काम करीत आहेत तर समाजाचे विविध प्रश्न,समस्या सोडविण्याच्या हेतूने प्रसिद्धीच्या माध्यमातून आपले काम करीत असतात. त्यामुळे पत्रकारांच्या विरोधात कुठल्याच गैरकृत्याला पाठीशी घालण्यात येणार नाही. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे. चांगल्या कामाचा, विचारांचं व कृतीचा पुरस्कार; तर वाईट प्रवृत्ती, गैरवर्तन आणि समाज विघातक कृत्यांचा धिक्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पत्रकार आहे. पत्रकारांना पूर्णतःसंरक्षण देण्यात येणार आहे पण याचा कोणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचा वचक सर्वांवर राहिलाच पाहिजे. पत्रकार विरोधी होणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. असे राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन बैठकीत मत व्यक्त करताना पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक (एस.पी.) डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. शेवटी देशमुख यांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्ह्यात आदर्शवत उत्तम काम चालू आहे. असेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश संलग्न पुणे जिल्हा महिला मंच या पत्रकार संघटनेची पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक (एस.पी.) डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हास्तरीय झूम ऍपवर ऑनलाइन बैठक एकूण ४५ प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे राज्य उपाध्यक्ष सुनील थोरात, या पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नितीन करडे, जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, जिल्हा सदस्य गणेश तिखे, जिल्हा सदस्य प्रशांत तुपे, हवेली तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटेकर, हवेलीचे उपाध्यक्ष प्रविण शेंडगे, आंबेगाव तालुध्यक्ष नंदु बोऱ्हाडे, इंदापूर तालुकाध्यक्ष गौतम पिसे, शिरुर तालुका कार्याध्यक्ष शंकर पाबळे, शिरूरचे उपाध्यक्ष विजय थोरात, वडगावशेरी विभागीय अध्यक्ष पौर्णिमा कांबळे आदी पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.
तसेच राज्य मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे, जिल्हा मार्गदर्शक व सल्लागार मोहिनी भोसले, जिल्हा उपाध्यक्षा अलका सोनवणे, जि.कार्याध्यक्षा शितल शेडगे, जि.संपर्क प्रमुख आशा थोपटे, जि.निमंत्रक दिपाली नलवडे, पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा रेश्मा लिमकर, पुणे शहर संघटक निलिमा अलुलकर, पिंपरी चिंचवडच्या उपाध्यक्षा मंगल पवार, पिंपरी चिंचवडच्या कार्याध्यक्षा रेश्मा खान, पिंपरी चिंचवडच्या संपर्क प्रमुख सुषमा बुर्डे, हवेली तालुकाध्यक्षा अध्यक्षा आसमाॅ शेख, हवेलीच्या उपाध्यक्षा सोनाली सोनवणे, हवेलीच्या मुख्य संघटक राणी साळुंके, हडपसरच्या उपाध्यक्षा कल्पना बहिरट, पिंपरी उपाध्यक्षा फेमिदा खान, भोसरीच्या अध्यक्षा सारिका मेंढेकर, भोसरीच्या कार्याध्यक्षा सुमन प्रसाद, भोसरी सह कार्याध्यक्षा सुचिता पवार, भोसरी संघटक सुषमा भालेकर, भोसरी सह संघटक रोहिणी मदने, सदस्य सुनंदा पाटील, सदस्य शबाना अश्रफी या ऑनलाइन बैठकीमध्ये उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष सुनील थोरात यांनी मार्गदर्शन केले. स्वागत जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे यांनी केले. महिलांचे आभार महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे यांनी मानले. नियोजन व सूत्रसंचालन जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे यांनी केले, तर जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे, नितीन करडे यांनी आभार मानले.
०००००