स्वतःच्या जातीपेक्षा गावच्या मातीवर अधिक प्रेम करणारा एक कलंदर अवलिया हरपला…
पत्रकार सुनीलजी ओव्हाळ
एक अवलिया …….Miss you Patil …….
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी
पत्रकार सुनीलजी ओव्हाळ पाटील यांच्या निधनाची बातमी कळली आणि मन विषण्ण झाले . ……
पाटलांच्या आठवांनी डोळ्यासमोर एकच गर्दी केली. पाटलांच्या नेमक्या कोणत्या आठवणी सांगाव्यात ? माझ्या मते अथांग पसरलेल्या रात्रीच्या आभाळात काही ठळक तारका जशा अभाळाचे सौंदर्य खुलवतात, तशीच अशी माणसं समाजाचे, जनमाणसाचे सोंदर्य वाढवतात ..माणसांच्या अथांग गर्दीत आपले वेगळेपण जपून असतात.
पाटीलही याच जातकुळीतले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मी पाहिले. एक निर्भय पत्रकार, कलंदर अवलिया, जाणकार समीक्षक, कुशल प्रशासक, प्रेमळ पिता, कलाकार दिग्दर्शक, विद्रोही लेखक, साहित्यिक, सच्चा मित्र आणि पाठीराखा ……असे कित्येक..
मला भावला पण तो त्यांच्यातील कलंदर माणूस..
जे करायचं ते बिनधास्त, आणि ते प्रांजळपणे कबुलही करायचं, मोडेन पण वाकणार नाही हा पाटलांचा बाणा….
मस्तीत पण, शिस्तीत जगायचं..
हेच पाटलांचे जीवनव्रत …
भोसे गावात गेलो आणि पाटलांना फोन झाला नाही असे झाले नाही …
आमची बैठक रंगली की गप्पांचा बार असा उडायचा की सगळं विसरायला व्हायचं..
स्वतःपेक्षा हा माणूस गावाबद्दल , मित्रांबद्दल बोलायचा ……
स्व. मधूशेठ लोणारी (अण्णा) यांच्या आठवणी ऐकाव्यात त्या फक्त पाटलांच्या तोंडुनचं ..
स्वतःच्या जातीपेक्षा गावच्या मातीवर जास्त प्रेम करणारा हा माणूस म्हणूनच मला भावून गेला, आयुष्यातील गमतीजमती पाटलांशी शेअर करताना वयाचे वा जातीपातीचे बंधन कधीच आडवे आले नाही …
पाटलांबरोबर एकदा कोकणात फिरायला जायचे आणि जेवायला जायचे मात्र राहूनच गेले आणि जीवनाच्या
क्षणभंगूरतेचे काळे सत्य मनात खोलवर रुजून बसले
ते कायमचे ….
विनम्र आदरांजली ..जयभीम 💐💐
रवी साकोरे –
( एक पाटीलप्रेमी पत्रकार )