पार्थदादा पवार व किशोर आवारे यांचे कार्य उल्लेखनीय : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पार्थदादा पवार व किशोर आवारे यांचे कार्य उल्लेखनीय : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या वतीने आयोजित मोफत लसीकरण केंद्रास अथर्व हॉस्पिटल येथे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली. कोरोना मोफत लसीकरण केंद्र अथर्व हॉस्पिटल व पायोनियर हॉस्पिटल येथे पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अथर्व लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. या वेळी काही नागरिकांना आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब यांचे उपस्थितीत लस देण्यात आली. अथर्व हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात पार्थ पवार व किशोर आवारे यांच्या लसीकरण मोहिमेला शुभेच्छा दिल्या. महाभारतातील प्रसंगांचे अनेक दाखले देत कृष्ण प्रकाश यांनी उपस्थितांची मने जिंकली.
जनसेवा विकास समितीचे प्रवक्ता मिलिंद अच्युत यांनी लसीकरणाची वस्तूत माहिती दिली. स्त्री शक्ती भाजी व फ्रुट मार्केट संपूर्ण लसीकृत झाले असून किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तळेगाव शहर लसीकृत करणार असल्याचे प्रवक्ता मिलिंद अच्युत यांनी नमूद केले. अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित माने यांनी कोरोनाच्या नवीन लाटे विषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधोकारी चंद्रकांत लोहरे, लोकमत वृत्तसमूहाचे वार्ताहर विलास भेगडे व आवाज न्यूज वाहिनीच्या रेश्मा फडतरे यांचा आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पार्थ पवार फौंडेशनचे सत्यम खांडगे यांनी आभार मानले.
या वेळी डॉ राजेंद्र देशमुख, अनिल धर्माधिकारी, अविनाश बोडके, कल्पेश भगत, सुनील पवार, ऋषी अरोरा, अथर्व हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
● जनसेवा विकास समिती व पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने माझा सत्कार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब यांच्या हस्ते केला, त्याबद्दल शतशः आभार.
किशोर आवारे हे मावळ तालुक्यातील सर्व सामन्यांचे नेतृत्व करतात, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— विलास भेगडे
वार्ताहर लोकमत वृत्तपत्र समूह