पांगरी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी, जिल्हा परिषदेकडून ७४ लाख ५० हजाराचा निधी मंजूर
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : पांगरी येथे प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी गावाला पिण्यासाठी पाणी ( वॉटर स्किमची ) मागणी केली होती. गावाची ही मागणी पाहता जि. प. परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद मधून ७४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजुर करुन उपलब्ध करुन दिला.
नुकतेच दोन दिवसापूर्वी या नळ पाणी योजनेचे भुमीपुजन करण्यात आले व लगेचच प्रत्यक्षात कामास सुरवात करण्यात आली. या भुमीपूजनाच्या वेळी ग्रा. पं. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या योजनेसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.