निधन वार्ता : विठोबा भिकाजी दवणे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : आंबेठाण ( ता. खेड ) येथील प्रगतशील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांचे सहकारी विठोबा भिकाजी दवणे ( वय ८५ वर्षे ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत दवणे यांचे ते वडील, तर खराबवाडीचे माजी उपसरपंच काळुराम केसवड यांचे ते मेहुणे होत.