निधन वार्ता : गं भा तान्हुबाई बबन कड
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील गं. भा. तान्हुबाई बबन कड ( वय ८२ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच हनुमंतराव अनंतराव कड यांच्या त्या चुलती, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र कड व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कड यांच्या त्या मातोश्री, तर माजी ग्रामपंचायत सदस्य पारुताई कड व चित्रा कड यांच्या त्या सासू होत.