हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड युवा उद्योजक प्रीतम कड यांचे निधन
हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड
युवा उद्योजक प्रीतम कड यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम उमाजी कड ( वय ३६ ) यांचे सोमवारी ( दि. २५ मे ) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सर्वांशी तोंडभरून बोलणारा, सतत हसतमुख असणारा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. खराबवाडीच्या माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नूतन कड यांचे ते पती होत. खराबवाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐💐००००