निधन वार्ता : किशोर गोरे ( सर )

चाकण : येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेतील आदर्श शिक्षक व जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार किशोर चंद्रकांत गोरे सर ( वय ४८ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चुलते असा परिवार आहे. चाकण गावचे पोलीस पाटील वसंतराव गोरे यांचे ते पुतणे होत.