Thursday, August 28, 2025
Latest:
इंदापूरनिधन वार्ता

जीवंधर दोशी यांचे निधन

जीवंधर दोशी यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त, नामवंत व्यापारी जीवंधर पमुलाल दोशी ( वय ८० ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी ( दि.२३ ऑगस्ट ) निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक मिलींद दोशी, इंडिअन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ.सागर दोशी, छत्रपती शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते शेखर दोशी व पार्श्वनाथ युवक मंडळाचे संस्थापक मंगेश दोशी यांचे ते वडील होत.

शहरातील नामवंत व्यापारी असणा-या दोशी यांचे येथील पार्श्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात मोठे योगदान होते. जीवंधर दोशी यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणीक शहा यांनी व्यक्त केली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!