निधन वार्ता – जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे यांचे निधन…
निधन वार्ता – जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे यांचे निधन…
महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : जांबवडे ( ता. मावळ ) गावच्या प्रथम महिला सरपंच, शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रादयातील कार्यकर्त्या कविता संजय भांगरे (वय ५२ वर्षे) यांचे रविवारी (दि.४) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना माहेर आणि सासरचा सांप्रदायीक वसा आणि वारसा लाभला होता. त्यांच्या मागे सासरे, पती, दिर, तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
जांबवडे गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी, तर उद्योजक मदन भांगरे, चेतन भांगरे, विक्रम भांगरे यांच्या त्या मातोश्री होत. प्रगतिशील शेतकरी नारायण भांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नथू भांगरे यांच्या त्या सुनबाई होत.
सन १९९९ – २००४ या पाच वर्षांच्याकालावधीत त्यांनी सरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळली. सरपंच पदाच्या काळात त्यांनी अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि सुधारित पाणी पुरवठा योजना मार्गी लावली. त्यांच्या पुढाकाराने निशीगंधा महिला बचत गट स्थापन करण्यात आला. त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला.
जांबवडे येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
निवडक नातेवाईक उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य शांताराम बापू कदम,
जांबवडे गावचे पोलीस पाटील जगन्नाथ नाटक पाटील
यांनी श्रद्धांजली समर्पित केली.
—-