निधन वार्ता : कबड्डीपट्टू बाबाजी तांबोळी

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील वडगांव सहाणीचे गावचे माजी उपसरपंच व जुन्नर तालुका कबड्डी असोशिअन चे अध्यक्ष बाबाजी बन्सी तांबोळी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुणे जिल्ह्यात कबड्डी क्षेत्रात त्यांनी खेळाडू म्हणून आपला दबदबा निर्माण केला होता. कबड्डी खेळासाठी वाहून घेतलेल्या बाबाजी यांनी आपल्या सहजसुंदर आणि कौशल्यपूर्ण खेळाने लौकिक मिळवला होता .वडगाव सहाणी चे उपसरपंच म्हणूनही काम पाहिले होते. कबड्डीच्या मैदानावर बाजी मारणाऱ्या बाबाजी यांना जीवनाच्या संघर्षपूर्ण लढतीत मात्र हार मानावी लागली. अतिशय उमद्या स्वभावाच्या बाबाजी यांच्या निधनामुळे कबड्डी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.