Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनापुणे शहर विभाग

नव्याने कोविड-19 चे बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.9:- कोरोना विषाणुच्या अनुषंगाने ज्या परिसरात नव्याने कोविड-19 चे बाधीत रुग्ण आढळून येतील त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. या त्यातील पोटकलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 12 मार्च 2020 पासून लागू करुन 2,3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच ज्या परिसरात नव्याने कोविड-19 ये बाधीत रुग्ण आढळून येतील. त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्हयात उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांचे मार्फत कोरोना विषाणू बाधित भागात प्रतिबंधित क्षेत्र किंवा सुक्षम प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना परिसरात 1 किंवा 2 रुग्ण आढळले असताना संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात घेत आहे. त्यामुळे त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना देखील बंद करण्यात येत आहेत असे निदर्शनास येत आहे.
तरी सर्व उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना सूचित करण्यात येते की, त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना 1 किंवा 2 रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नयेत. सोसायटी मध्ये रुग्ण आढळला असल्यास, सोसायटी मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात यावा, परंतू सोसायटी जवळील स्वतंत्र उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करू नयेत.
उद्योग व औद्योगिक आस्थापनेमध्ये 1 किंवा 2 रुग्ण आढळल्यास, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक ट्रेसिंग करुन आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नये, तसेच रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने बंद करणे आवश्यक असल्यास, याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्यात यावी. त्यानंतरच तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशीत केले आहे.

error: Content is protected !!