नाभिक समाजातील व्यावसायिकांसाठी सुरक्षा कवच किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहीते पाटील व माजी जि. प. सदस्य सुरेखाताई मोहीते पाटील यांच्या तर्फे खेड तालुक्यातील नाभिक व्यवसाय करण्याऱ्या बंधुंसाठी सुरक्षा कवचचे संपूर्ण किट व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि. प अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, माजी जि. प. कृषी आणि पशु संवर्धन सभापती अरुणशेठ चांभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारु गवारी, सामाजिक कार्यकर्ते सुखदेवतात्या पानसरे, युवा उद्योजक मयुरशेठ मोहिते पाटील व नाभिक समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते.