मुंबईतील वाहनांवर लागणार स्टिकर, पाहा; हिरवा, पिवळा व लाल रंगाचा स्टिकर कशासाठी आहे?
मुंबईतील वाहनांवर लागणार स्टिकर, पाहा; हिरवा, पिवळा व लाल रंगाचा स्टिकर कशासाठी आहे?
● अत्यावश्यक सेवेतील खाजगी वाहनांसाठी मुंबई पोलिसांनी जारी केले तीन रंगांचे स्टिकर
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्यभरात चालू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेच्या खाजगी वाहनांसाठी ३ रंगांचे स्वतंत्र स्टीकर देण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी वाहनांवर ३ रंगांचे स्टिकर कोड बसवण्यात येणार असल्याचे शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नारळीकर यांनी सांगितले.
कलम १४४ नुसार, शहरात रंगाचे स्टिकर असणारी वाहनेच फक्त चालणार. लाल, पिवळा, हिरवा या ३ रंगांचा वापर केला जाणार. हे स्टिकर वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला देखील लावण्यात येणार. पोलीस आयुक्त हेमंत नारळीकर यांनी सांगीतिले कि, कलर कोडचा दुरुपयोग झाल्यास आयपीसी कलम ४१९ नुसार, पोलीस कारवाई करणार.(Mumbai Police has issued color code stickers for private vehicles)
● असे आहेत कलर कोड : यात डॉक्टर, ऍम्ब्युलन्स आणि मेडिकल सेवांच्या वाहनांसाठी लाल रंग, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी इतर खाद्यपदार्थांच्या वाहनांसाठी हिरवा रंग, बीएमसी कर्मचारी, वीज विभाग, टेलिफोन विभाग, पत्रकारिता विभाग व इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पिवळ्या रंगाचा स्टिकर असणार.
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कलर कोड स्टिकर मिळणार. विनाकारण खाजगी वाहने घेऊन फिरणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यासाठी आणि वाढते ट्रॅफिक रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हि कल्पना केली आहे. या स्टिकरचा दुरुपयोग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार.
—–