मुख्यमंत्री १४ एप्रिलला लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता, राजेश टोपे यांची माहिती !
मुख्यमंत्री १४ एप्रिलला लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता, राजेश टोपे यांची माहिती !
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्व पक्षीय नेत्यांबरोबर बैठक पार पडली होती त्यातच रविवारी टास्कफोर्स बरोबर सुद्धा त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लॉकडाऊन लावायचा आणि जर लावला तर किती दिवसाचा जाहीर करायचा या संदर्भात चर्चा झाली होती.
त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या १४ एप्रिल या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या राज्याच्या टास्क फोर्सच्या या बैठकीत लॉकडाऊन विषयी संखोल चर्चा करण्यात आली. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी लॉकडाऊन लागू करावे असे मत मांडले आहे. राज्यात करोना संसर्गाची स्थिती पाहता सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील बहुतेक सदस्यांचे मत आहे.
तसेच काही सदस्यांचे वेगळेही मत आहे. मात्र बहुतेक तज्ज्ञांचे मत हे मत हे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
—–