मोहितेवाडीत शिवसेनेतर्फे गरजूंना किराणा किट वाटप
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
शेलपिंपळगाव : मोहितेवाडी ( ता. खेड ) येथे शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने आणि खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराजे वरपे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू नागरिकांना किराणा किट वाटप करण्यात आले.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
यावेळी खेड तालुका युवासेना सरचिटणीस धंनजय पठारे, युवासेना उपतालुका प्रमुख विशाल पोतले, वाहतूक सेनेचे उपतालुका प्रमुख अमोल इंगळे, शिवसेना उपविभाग प्रमुख रायबा साबळे, विभाग प्रमुख मोहनराव वाडेकर, कोयाळी शाखा प्रमुख बाबूराव कोळपे, शाखा प्रमुख सिध्दार्थ गायकवाड, ह.भ.प चैतन्य महाराज मोहिते, मा. ग्रा. प. सदस्य नामदेवराव पाबळे, युवा उद्योजक गणेश मोहिते, वेगरे पुनर्वसन गावठाणचे युवा नेते सतिश मारणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोहिते, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते.