माऊली मंदिरासह राज्यातील मंदीरे दर्शनास खुली करा : डी. डी. भोसले
महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंदीरे बंद होऊन ६ महीने झाली तरी मंदीर उघडण्याबाबत प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक डि.डि.भोसले पाटील केली आहे.
आळंदी तीर्थक्षेत्रासह अनेक मंदीरे असलेल्या देवस्थान गावातील अर्थ व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर अवलंबून आहे कोरोणा मुळे मंदीर बंद असल्यामुळे अर्थ व्यवस्था पुर्ण ढासळली असून देव दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणाऱ्या व्यवसाय आणि व्यापारावर आळंदी शहराची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. परिणामी बहुतांशी प्रसादाची आणि हार फुलांचे छोटे मोठे व्यावसायिक आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शहरातील बहुतेक नागरिकांचा उदरनिर्वाह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरच अवलंबून आहे.
देशातील अनेक देवस्थान अटी आणि नियमानुसार सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर सुरू करण्यात यावे. त्यामुळे आळंदी शहरातील विस्कळीत झालेली घडी सुधारेल राज्यातील भाविक आणि आळंदीकर ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन मंदीर दर्शनासाठी खुले करावे. तसेच कोरोना बाबतीत सर्व प्रकारची खबरदारी देवस्थान कमिटीने घेणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी भोसले पाटील यांनी केली आहे.