Saturday, April 19, 2025
Latest:
उद्योग विश्वपुणे

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करावी – सहायक आयुक्त श्रीमती पवार

महाबुलेटीन नेटवर्क 
पुणे : पुणे जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे ) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची  पुरुष तसेच स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या ww.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
                जून 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांखिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रास्तापेठ,पुणे या कार्यालयाद्वारे सुरू असून या सर्व आस्थापनांकडून चांगला  प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे, त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या ww.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2020 ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व या कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे. प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील ( Employer Profile ) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा, असे आवाहन जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अ. उ. पवार यांनी केले आहे.
या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी  punerojgar@gmail.com /asstdiremp.pune@ese.maharashtra.gov.in  यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सुचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!