मंथन फाउंडेशनचे कोविड १९ मध्ये अविरत सेवा कार्य, १२० तृतीयपंथीयांना किराणा वाटप
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : मंथन फाउंडेशन दुर्लक्षित , दुर्बल घटकांसाठी गेली अनेक वर्ष काम करत आहे. मंथन फाउंडेशन संस्थेने हमसफर ट्रस्टच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड मध्ये १२० तृतीय पंथी यांना महिना भर पुरेल इतका किराणा माल देण्यात आला. यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, हळद, तिखट, मीठ, तेल, कपडे, आंघोळीचा साबण, डिटर्जंट, कांदा, बटाटा व सॅनिटायझर इत्यादि वाटप केले गेले.
यावेळी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, संस्थेचे देविदास मोरे, सूरज भट्ट, आयुष कापडी, निखिल डोंगरे, तृतीयपंथी जस्सी, दलजीत, शिवण्या पाटील, तनिषा, साक्षी, कुमाऊँ मित्र मंडळाचे कार्यकर्ते देवेंद्र सिंग ढेक आदी उपस्थित होते. यासाठी हम सफर ट्रस्ट मुंबई, संदीप माने व दिनेश चोपडे यांचे सहकार्य लाभले. उपक्रमाचे संयोजन मंथन फाउंडेशन, हम सफर ट्रस्ट व सर्व तृतीय पंथी यांनी केले होते.