माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर ( वय ९१ ) यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज ( दि. १६ ) अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांना कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. मात्र साधारण कफ होता. दरम्यान त्यांची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मधुमेह असल्याने अधिक काळजी घेतली जात आहे. यासंदर्भात त्यांचे नातू माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, “त्यांची प्रकृती स्थिर स्थिर असून त्यांना १४ जुलैला ताप आला होता. त्यांना उपचारासाठी निलंगा येथून लातूरला आणले असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मला खात्री आहे ते कोरोनावर मात करून पुन्हा आपल्याशी संवाद साधतील, मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हलविण्याचा विचार सुरू आहे.”